25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणी१४३ शाळांच्या दुरूस्तीसाठी सात कोटींचा निधी मंजूर

१४३ शाळांच्या दुरूस्तीसाठी सात कोटींचा निधी मंजूर

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा परभणी जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता आपण सर्वजण कटीबध्द आहोत. जिल्ह्यात निजामकालीन जुन्या मोडकळीस आलेल्या १४३ शाळाच्या दुरुस्ती करिता ०७ कोटी रुपये तर १०५ शाळांची पुर्नबांधणी २० कोटी ८९ लक्ष निधी मंजुर झाला आहे. तसेच आदर्श शाळा विकसीत करण्यासाठी १९ शाळांना मान्यता देण्यात आली आहे. या शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १४ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलावर महाराष्ट्र राज्याच्या ६२व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री श्री.मुंडे बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, खा.डॉ. फौजिया खान, सर्वश्री आ.डॉ. राहूल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त देविदास पवार अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, यावर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुरपरिस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात शेतीबरोबरच पायाभूत सुविधांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत पहिला आणि दूसरा डोस घेतलेला नाही त्यांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्री.मुंडे यांनी केले. स्व.बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणारा नांदेड-जालना द्रुतगती ९४ कि.मी.चा मार्ग जिल्ह्यातून जात असून, या द्रूतगती मार्गामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळण-वळणाची सुविधा गतीमान होण्यास मदत होणार आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील ०१ लाख ८४ हजाराहून अधिक कर्जखात्यांवर ०१ हजार १५१ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजने अंतर्गत जिल्ह्यातील २२ हजाराहून अधिक शेतक-यांच्या खात्यावर ६५ कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ६२ शाळेतील १२४ वर्ग डिजीटल करण्यासाठी शाळांना साहित्य पुरवठा करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ४२ अनिवासी हंगामी वसतीगृह सुरु करण्यात आली असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले. सुत्रसंचलन प्रा.वायकोस यांनी केले. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या