25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeपरभणीराष्ट्रीय लोक अदालतमध्ये ७३३ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ७३३ प्रकरणे निकाली

एकमत ऑनलाईन

परभणी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा श्रीमती यू.एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकुण ७३३ प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी ३२ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून अनेक दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. प्रलंबित ७ हजार ८३९ प्रकरणांसोबतच विशेष मोहिमेच्या माध्यमातून ४४२ आणि वादपूर्व ८ हजार ५११ प्रकरणे अशी एकूण ९ हजार ६८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ७ हजार ८३९ प्रलंबित प्रकरणांमधून ७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ६ कोटी १९ लाख तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व २५ हजार ६८८ दाव्यापैकी ८ हजार ५११ दावे निकाली काढून ५ कोटी ४ लाख ४७ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

एकूण ९ हजार २४४ दावे निकाली काढण्यात येऊन ११ कोटी २३ लाख रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत ४९४ दावे सुनावणीसाठी घेण्यात येऊन त्यापैकी ४४२ दावे निकाली काढण्यात आले. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी. लांडगे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या