22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeपरभणीराज्यभरातून चोरी झालेल्या ८ दुचाकी पकडल्या

राज्यभरातून चोरी झालेल्या ८ दुचाकी पकडल्या

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्यातील आठ पोलिस स्टेशन अंतर्गत चोरी करण्यात आलेल्या ८ दुचाकी शहरातील विविध ठिकाणाहून जप्त करण्यात आल्या आहेत़ या प्रकरणी अद्याप कोणत्याही आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही़ परंतू चोरीच्या ८ दुचाकी शहर वाहतूक शाखा पोलिसांनी पकडल्यामुळे दुचाकी चोरी करणा-यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत चोरी करण्यात आलेल्या दुचाकींचा पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून शोध सुरू होता. परभणी शहर वाहतूक शाखेच्या पथकाने जुलै २०२२ या महिन्यात शहरातील धाररोड, वांगी रोड, जिंतूररोड, वसमतरोड परीसरात संशयास्पद आढळलेल्या गाडयांच्या चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले़ या कारवाईत गेल्या एक महिन्यात पोलिसांनी चोरीच्या ८ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये उमरी पोलिस स्टेशन नांदेड, वाळूज पोलिस स्टेशन औरंगाबाद, साकीनाका पोलिस स्टेशन मुंबई, जवाहर नगर पोलिस स्टेशन औरंगाबाद, सिडको पोलिस स्टेशन नांदेड, कंधार पोलिस स्टेशन नांदेड, विश्रामबाग पोलिस स्टेशन पुणे, पूर्णा पोलिस स्टेशन परभणी या ठिकाणच्या या चोरी करण्यात आलेल्या गाड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या गाड्या सापडल्याबाबत संबंधीत पोलिस स्टेशला परभणी वाहतूक शाखा पोलिसांच्यावतीने कळवण्यात आले असून या प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनकडून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक आणि परभणी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शेख खदिर, निलेश कांबळे, शेख मुस्ताक, अजय भराडे, अविनाश भिसे यांच्या पथकाने केली़ शहर वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरी करणा-यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या