23.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home परभणी परभणी मनपाच्या रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये ९ व्यापारी पॉझिटिव्ह

परभणी मनपाच्या रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये ९ व्यापारी पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने २५ ऑगस्ट मंगळवार रोजी शहरातील १५ केंद्रावर ६३२ व्यापा-‍यांची रॅपिड अ‍ॅटीजन टेस्ट करण्यात  आली. त्यामध्ये ६२३ निगेटिव्ह तर ९ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहीती मनपाच्या वतीने देण्यात आली.

शहरातील सिटीक्लब येथे ५९ व्यापा-‍यांची तपासणी करण्यात आली त्यातून २ व्यापारी बाधित आढळले. आयएमए हॉल येथे ३९ व्यापा‍-यांची तपासणी करण्यात आली. त्यातून ३ व्यापारी बाधित आढळून आले. बालविद्या मंदिरात ६९ व्यापा-‍यांची तपासणी करण्यात आली त्यातून १ व्यक्ती बाधित आढळला. साखला प्लॉट येथील आरोग्य केंद्रात ४२ जणांची तपासणी करण्यात आली, त्यातून २ व्यक्ती बाधित आढळल्या. यशोधन नगरातील मनपाच्या रुग्णालयात २५ जणांची तपासणी करण्यात आली त्यातून १ व्यक्ती बाधित आढळला.

शहरातील बॅडमिंटन हॉल २६ जणांची, बाजार समितीत ७८ जणांची, ईनायत नगरातील आरोग्य केंद्रात २२ जणांची, खंडोबा बाजार येथ्लृील आरोग्य केंद्रात ४७ जणांची, खानापूर येथ्लृील आरोग्य केंद्रात ७ व्यापा‍-यांची, कोठारी कॉम्प्लेक्स येथे ३७ जणांची, अपना कॉर्नर येथील मौलाना आझाद वाचनालयात १०२ जणांची, नुतन महाविद्यालयात २१ जणांची, जागृती हनुमान मंदिरात २८ जणांची, औषधी भवन येथे ३० व्यापा‍र्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी, समन्वयक गजानन जाधव, अमोल काटुके, समॅुअल, अमोल सोळंके यांच्यासह आरोग्य विभाग, मलेरिया विभाग, स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी टेस्टसाठी परिश्रम घेतले.

रॅपिड अँटीजन टेस्ट न केलेल्या दुकानदारांवर होणार कारवाई : आयुक्त
शहरासह जिल्ह्यात सर्व दुकानदार आणि तिथे कार्यरत कामगारांना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. यासाठी प्रशासनाने २४ ऑगस्टपर्यंत दिली होती. त्यानंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास दुकाने बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार परभणी शहर मनपाकडून तिन्ही प्रभागात पथकांद्वारे २५ ऑगस्ट रोजी दुपारपासून सर्व आस्थापना व दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

सर्व दुकानदारांनी स्वत:ची आणि त्यांच्याकडे कार्यरत कर्मचा-यांची कोरोना चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मृत्यूची संख्याही वाढली आहे. बाजारपेठांमध्ये होणा-या गर्दीमुळे कोरोना वाढल्याचा प्रशासनाला संशय आहे. त्या धर्तीवर मनपा आयुक्त देविदास पवार यांनी शहरातील सर्व दुकाने आणि प्रतिष्ठानांचे मालक व कार्यरत कर्मचा-यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. यासाठी शहरात 16 ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करून 24 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती.

आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. मनपा अधिका-यांतर्फे आकस्मिक तपासणी करून चाचणीचे प्रमाणपत्र नसलेल्यांची दुकाने बंद करण्यात येणार आहे. याकरिता मनपाने प्रभागनिहाय पथके तयार केली आहेत. मनपाचे अधिकारी दुकानात आल्यानंतर प्रमाणपत्र मागितल्यानंतर आणि दुकान बंद केल्यानंतर आता व्यापारी चाचणीकरिता धावाधाव करत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी काही ठिकाणी पहावयास मिळाले. या पथकात आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदशर्नाखाली सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, महेश गायकवाड, अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक कारण गायकवाड आदींचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १३ रुग्ण, एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या