16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeपरभणीपरभणी बाजार समितीत कापसाला ९१०० रू. चा दर

परभणी बाजार समितीत कापसाला ९१०० रू. चा दर

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवार, दि. २१ नोव्हेंबरपासून खासगी व्यापा-यामार्फत जाहीर लिलावाव्दारे कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. कापुस खरेदी शुभारंभ प्रसंगी सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. टि.एम.सी मार्केट यार्डात जवळपास २५ वाहने आली असून खरेदीदारांमार्फत कापसास किमान रु.८९३० तर कमाल रु. ९१०० व सर्वसाधारण रु.८९७० दर देण्यात आला.

टी.एम.सी मार्केट यार्डात कापुस जाहीर लिलावापुर्वी मार्केट यार्डात सर्वप्रथम कापुस घेऊन येणा-या प्रसादराव टेकाळे रा. जलालपुर, सदाशिव नाईक, गंगाधरराव मोरे, वसंतराव देशमुख, रा. साडेगांव, सचिन दंडवते, मुंजा कदम, सुभाष सामाले, देवानंद राऊत, अविनाश पुके, टाकळी (कु.), संतोबा पुंजारे, जलालपुर, अनंत देशमुख टाकळी (कु.) या ११ शेतकरी बांधवांचा तसेच कापुस खरेदीदार हरिष कत्रुवार, अजय सरिया, बालुसेठ शर्मा, सुभाष अंबिलवादे, विनोद जाजु, ओमप्रकाश डागा यांचा बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव आवचार, सदस्य सोपानराव आवचार, गणेशराव घाटगे, रावसाहेब रेंगे, चंद्रकांतराव पांगरकर, संदिप भंडारी, रमेशराव देशमुख, शामराव इंगळे, फैजुल्ला खान पठाण व सल्लागार सुरेश तळणीकर यांचेहस्ते रुमाल, टोपी, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मोतीलाल जैन, बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहाय्यक सचिव प्रभुसिंह परिहार, भगवान सोनुले, विनय औंढेकर, संतोष रसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, बाजार समितीचे कर्मचारी विलास रेंगे, प्रल्हाद सोळंके, मंगेश विखे, यमाजी मस्के, विक्रम देशमुख, गजानन रेंगे, विश्वजीत परिहार, शाम मस्के व शेतकरी बांधव मोठया प्रमाणावार उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या