Thursday, September 28, 2023

महात्मा गांधी विद्यालय आडगावचा ९७.४३ टक्के निकाल

जिंतूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन तालुक्यातील आडगाव बाजार येथील महात्मा गांधी विद्यालयातील परिक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादित केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांच्या वतीने शाळेचे कौतुक होत आहे.

जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आडगाव बाजार येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केल्याने शाळेचा निकाल ९७.४३ टक्के लागला आहे. या मध्ये सय्यद तहेनियात याकुब ८९ टक्के गुणांसह सर्व प्रथम, चव्हाण लक्ष्मी राजु ८८.४० टक्के द्वितीय तर शेख महेक राजु ८७.२० टक्यांसह तृतीय आली आहे.

शाळेतील परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थी पैकी विशेष प्राविण्याने १८ विद्यार्थी, प्रथम श्रेणी १२ विद्यार्थी, व्दितीयश्रेणी ७ विद्यार्थी व तृतीय श्रेणी १ विद्यार्थीचा समावेश आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सय्यद हकीम, संस्था सचिव सय्यद याकूब, मुख्याध्यापक जाधव जी.पी. व शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या