24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणी२० वर्षीय तरूणीचा पतीनेच केला खून

२० वर्षीय तरूणीचा पतीनेच केला खून

एकमत ऑनलाईन

पुर्णा : येथील रेल्वे स्टेशन परिसरातील तडीपार मैदानात दोन दिवसांपुर्वी २० वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळला होता. या तरूणीची तिच्या पतिनेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी पतीस हैदराबाद येथून अटक करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अरबाज खान पठाण वय २२ वर्षे असून मृतदेह आढळलेली तरूणी ही त्याची पत्नी आहे. कौटूंबिक वादातून आरबाज खान याने १९ सप्टेंबर रोजी पत्नीस पुर्णा रेल्वे स्टेशन येथे आणून तडीपार परिसरातील झाडामध्ये आणून दगड तथा ब्लेडने वार करून तिचा खुन केला होता. या प्रकरणात रेल्वे स्टेशनसह शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले होते. तपास दरम्यान आरोपी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर परभणी पोलिसांनी गुरूवार, दि. २२ रोजी हैदराबाद येथे केलेल्या कारवाईत ताब्यात घेतले. आरोपी अरबाज याचा एक महिण्यापुर्वीच विवाह झाला होता. त्याने वादातून पत्नीस जिवे मारल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या