24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीमटका खेळणा-या ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल

मटका खेळणा-या ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे बेकायदेशीररित्या लोकांकडून मोबाईलवर कल्याण व मिलन नावाचा मटका जुगाराचे आकडे घेणा-यास पकडण्यात आले. यावेळी मटक्यावर पैसे लावून जुगार खेळणारे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकुण ३० आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारठाणा येथे आरोपी हनानमिया हमीदुल्ला शेख राहणार दर्गारोड चारठाणा हे स्वत:च्या राहत्या घरासमोर दि. २१ रोजी ४.२५ वाजताच्या सुमारास कल्याण व मिलन नावाचा मटका जुगाराचे आकडे घेताना आढळून आले. यावेळी आरोपी संजय राठोड रा.जांब, बंडू चव्हाण रा. सावरगाव, मोहन राठोड रा. हलवीरा, भिकाजी पारवे रा. चारठाणा, नारायण राठोड रा. सावरगाव, धर्मा राठोड रा. सायखेडा, शिवा राठोड रा. सावरगाव, रामा चव्हाण रा. सावरगाव, लक्ष्मण रा. सावरगाव, साबळे रा. सावरगाव, सोनुळे रा. ब्राह्मणगाव, बालासाहेब केशव सौर रा.हनवत खेडा, सोपान, राजा रा.सावरगाव, भानुदास सुर्वे, भीमाशंकर आघाव रा. बोरकिनी, सोनुळे रा. सावरगाव, संदीप गीते, पवार रा. सायखेडा, भुजंग पांडुरंग राठोड रा. सावरगाव, परसराम रा. सावरगाव, राजू राठोड रा. चारठाणा, नामदेव जाधव रा. सावरगाव, बाळू गीते रा. गीते पिंपरी, कयूम इनामदार रा. चारठाणा, माणिक मामा राÞसावरगाव, रामा बुधवंत राÞवाई हे मटक्यावर जुगार लावताना आढळून आले.

तसेच आरोपी हनानमिया यांनी सदरच्या लोकांकडून मटक्याचे आकड्यावर पैसे घेऊन आरोपी शंकर राठोड रा. चारठाणा, राजेश काळे रा. वाटुर ता. परतूर जि. जालना यांना व्हाटसअप अंकाटवरून जुगाराच्या पट्ट्या पाठवल्याचे सांगितलेÞ या प्रकरणी चारठाणा पोह. गुलाब उत्तमराव भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील ३० आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत एक निळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत ५०००, एक लाल रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत ५००० व नगदी रोख रकम ११०७० असा एकुण २१०७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी सपोनि गायकवाड, पोउपनि. साने यांनी भेट दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या