21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeपरभणीचाळीस हजारांची लाच स्विकारणा-या लिपिकास पोलिस कोठडी

चाळीस हजारांची लाच स्विकारणा-या लिपिकास पोलिस कोठडी

एकमत ऑनलाईन

परभणी : ड्रायव्हिंग स्कूल परवाना नूतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अल्ताफ खान कलंदर खान पठाण यांना ४० हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने गुरूवार, दि. ३० जून रोजी रंगहाथ पकडले होते. दरम्यान लाच स्विकारल्या प्रकरणी आरोपी पठाण यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती समजते.

या प्रकरणी ३८ वर्षीय तक्रारदाराने ड्रायव्हिंग स्कुल परवाना नुतनीकरणासाठी प्रादेशिक परीवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अल्ताफ खान कलंदर खान पठाण वय ३८ यांनी ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे दिली होती़ याबाबत पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक पठाण यांनी ४० हजार रूपये लाचेची मागणी करून परिवहन कार्यालयाचे अभिलेख कक्षात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आरोपी पठाण यांच्या विरूध्द नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, पुणेचे पोलीस अधीक्षक श्री़राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस निरीक्षक संदीप व-हाडे, पो़नाईक किरण चिमटे, पो़शिपाई भूषण ठाकूर, चालक पो़शिपाई माळी यांनी केली़.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या