27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeपरभणीपेठशिवणीच्या शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

पेठशिवणीच्या शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

एकमत ऑनलाईन

पालम : तालुक्यातील पेठशिवणी येथील तरुण शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकीत कर्जाची परतफेड करण्याच्याचिंतेमुळे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.६ डिसेंबर रोजी घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, पेठशिवणी येथील तरुण शेतकरी गुणाजी शंकर शिनगारे (२४ वर्ष) यांनी पालम येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतून ६६ हजार पीक कर्ज घेतले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी पाऊस तर कधी जास्त यामुळे शेती व्यवसाय तोट्यात आहे.

बँकेच्या कर्जाच्या संबंधी वसुलीची नोटीस देण्यात आली. बँकेचे कर्ज कसे फेडावे याचा सतत मनात विचार करत असल्याने तेचिंताग्रस्त झाले होते. यातूनच त्यांनी शिवारातील शेतात ंिलबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंबंधी मयताचा भाऊ चक्रधर गुणाजी शिनगारे यांनी दिलेल्या फियार्दीवरून पालम पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भाऊजी असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या