25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीपंधराव्या राज्य महिला बेसबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पंधराव्या राज्य महिला बेसबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन

एकमत ऑनलाईन

परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य महिला बेसबॉल स्पर्धेचे आयोजन सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय परभणी व जिल्हा बेसबॉल असोसिएशन परभणीच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अशोक दुधारे तलवारबाजी निरीक्षक टोकियो ऑलिम्पिक, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे महासचिव राजेंद्र ईखणकर, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे, राजू शिंदे नाशिक, गोकुळ तांदुळे औरंगाबाद, संतोष खेन्डे सोलापुर, ज्ञानेश काळे सातारा, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मंगला राकारेड्डी, डॉ.नम्रता पाटील, डॉ.अर्चना जटानिया, डॉ. विनिता मुरगोड, डॉ. सोनिया भरत देवसरकर, डॉ. संध्या राठोड, डॉ. पल्लवी दाशेठवार उपस्थित होते. प्रास्ताविक बेसबॉल असोसिएशनचे राजेंद्र इखनकर यांनी केले.

सूत्रसंचालन क्रांति दैठणकर व संभाजी शेवटे व आभार प्रदर्शन शंकर शहाणे सचिव बेसबॉल असो. परभणी यांनी केले. आज झालेल्या साखळी सामन्यात बीड संघाने कोल्हापूरचा बारा- पाच, पुणे संघाने औरंगाबादचा बारा-एक, मुंबई शहर संघाने सोलापूरचा आठ-तीन, साता-याने अकोल्याचा दहा- शून्य, नाशिक संघाने बीडचा आठ- एक, पुणे संघाने लातूरचा आठ- चार, जळगावने अकोल्याच्या पाच- तीन तर साता-याने परभणीचा बारा- एक असा पराभव केला. राज्य बेसबॉल स्पर्धेला उपविभागीय अधिकारी डी.बी. शेवाळे., रवी पतंगे जिल्हा परिषद सदस्य लोहगाव, माजी नगरसेवक सचिन आंबिलवादे, तहसीलदार खळीकर यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या