24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीदाभा येथे बिबट्याने दोन वासरूवर हल्ला करून जीव घेतला

दाभा येथे बिबट्याने दोन वासरूवर हल्ला करून जीव घेतला

एकमत ऑनलाईन

जिंतूर ; जिंतूर तालुक्यातील परिसरातील दाभा येथील शेतशिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने दोन शेतकऱ्यांच्या आठ ते नऊ महिन्याचा गाईचे दोन वासरू वर हल्ला करत चावा घेऊन प्राण घेतल्याची घटना दि. १३ सप्टेंबर सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

जिंतूर तालुक्यातील इटली परिसरातील दाभा शेतशिवारात दि. १२ सप्टेंबर मध्यरात्रीच्या सुमारास दाभा येथील शेतकरी परमेश्वर माणिक गिरे व द्रौपदी विठ्ठल सदावर्ते या दोन शेतकऱ्यांच्या शेतात रात्री कोणीच नव्हते दरम्यान दि. १३सप्टेंबर सकाळ च्या सुमारास दोन्ही शेतकरी शेतात गेले असता त्याच्या झाडाला बांधलेल्या गाईच्या दोन वासरूला बिबट्याने हल्ला करून चावा घेत प्राण घेतल्याचे दिसून आले तसेच घटनास्थळावर बिबट्याच्या पायाचे जमीनीवर ठसे स्पष्ट दिसत होते अशी माहिती दाभा येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली असून घटनेची माहिती वन विभागाला दिली असता वन विभागातील वनपाल दुधारे यांनी गावात जाऊन शेत परिसरात असलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

यापूर्वी देखील वाघी (वडी)सर्कल व इतर परिसरात बिबट्याचे दर्शन व अनेक जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या मात्र पुन्हा एकदा बिबट्याने दोन वासरूंना फस्त केल्याने या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ नागरिकात भीतीचे वातावरण आहे त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावे.व दोन शेतकऱ्याचे जनावर खाल्ल्याने त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी म्हणून गावकऱ्यातून मागणी जोर धरत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या