26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीयेलदरी जलाशयातील बेटावर मृतावस्थेत आढळला बिबट्या

येलदरी जलाशयातील बेटावर मृतावस्थेत आढळला बिबट्या

एकमत ऑनलाईन

परभणी : जिंतूर तालुक्यातील किन्ही गावच्या शिवारात येलदरी जलाशयातील एका बेटाच्या काठावर एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला. कीन्ही गावच्या शिवारातील मत्स्यव्यवसाय करणा-या नागरिकांना १४ मे रोजी दुपारी 3 च्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले होते. बिबट्या आढळल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कीन्ही गावच्या सरपंच व पोलीस पाटील यांना घटनेची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर सदरील घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी आणि बामणी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक परभणी जयसिंग कचवे, वनपाल गणेश घुगे, वनपाल भंडारे, बामणी पोलीस स्टेशनचे अधिकारी गव्हाणे, कीन्हीचे सरपंच वाकळे आदीं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पाण्याच्या बाहेर काढले.

सदरील बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्युचे निश्चित कारण सांगता येईल असे वन विभागाचे आरएफओ कचवे यांनी सांगितले. या भागात मागे एक- दोन वेळा बिबट्या आढळून आला होता. मात्र तो वन विभागाच्या हाती लागला नव्हता. यावेळेला बिबट्या मृत अवस्थेत सापडल्याने या भागात आणखी बिबट्याचे वास्तव्य असू शकते अशी शक्य वर्र्तविली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

.. बरे झाले व्यापातून सुटले : मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या