29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeपरभणीजिवंत नाट्य कलावंतास केले मृत घोषित

जिवंत नाट्य कलावंतास केले मृत घोषित

एकमत ऑनलाईन

परभणी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेचा प्रताप उघडकीस आला असून परभणीतील कलावंत मधुकर उमरीकर यांना मृत घोषित केले आहे. तर जे हयात नाहीत त्यांना हयात दाखवण्याचा किमया या शाखेने साधली आहे. विशेष म्हणजे कलावंत मधुकर उमरीकर यांनी स्वत: दैनिक एकमत कार्यालयास भेट देवून आपण हयात असताना मृत दाखवले असल्याचा अ.भा.मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेचा लज्जास्पद प्रकार उघड केला असून परिषदेला या प्रकाराबद्दल सर्वत्र टिका होताना दिसून येत आहे.

परभणी येथे सन २०००मध्ये नाट्य संमेलन पार पडले. या वेळेला अनेक नाट्य कलावंतांनी आपली कला सादर केली. तसेच या संमेलनाच्या वेळेला परभणी येथील नाट्यकलावंतांनी मिळून शाखा निर्माण केली. या शाखेच्या माध्यमातून अनेक कलावंत पुढे आले. त्यापैकीच एक कलावंत म्हणजे उमरीकर यांनी आपल्या श्यामची आई एकपात्री प्रयोगातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत साने गुरुजी पोहोचवले. १४५८ प्रयोग महाराष्ट्रभर करणा-या या कलावंतास नुकताच आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि ते सद्यस्थितीत सुद्धा महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या माध्यमातून अनेक कलावंत घडवत आहेत. आजही श्यामची आईचे प्रयोग नि:शुल्क करणारे कलावंत उमरीकर यांना चक्क नाट्य परिषद मुंबई शाखेने शाखेने मृत घोषित केले. या लज्जास्पद प्रकाराबद्दल सर्वत्र टिका होताना दिसून येत आहे.

नाट्य परिषदेचा प्रकार लज्जास्पद : उमरीकर
अ.भा.नाट्य परिषद मुंबई शाखेचा हा प्रकार खळबळजनक असून विभागवार बैठक घेवून शहनिशा करून नाट्य चळवळीबाबत माहिती देणे आवश्यक आहे. परंतू तसे न करता आज हयात नसलेल्यांना हयात दाखवणे आणि जे कार्यरत कलावंत आहेत त्यांना मृत घोषित करणे हा अतिशय लज्जास्पद प्रकार आहे. नाट्यसृष्टी ख-या अर्थाने जिवंत ठेवण्याचे कार्य करणा-या कलावंतास मृत घोषित करणे हे संयुक्तिक वाटत नसल्याचे मत नाट्य कलावंत मधुकर उमरीकर यांनी व्यक्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या