26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीपरभणीत म्युकरमायकोसिस रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू होणार

परभणीत म्युकरमायकोसिस रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू होणार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना संसर्गा पाठोपाठ आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रूग्ण आढळून येत असल्याने या रूग्णांसाठी लवकरच जिल्हा परिषदेच्या नूतन ईमारतीत ५० खाटांचे स्वतंत्र कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा परिषद कोरोना सेंटरमधील ऑक्सीजनच्या ५० खाटांची संख्या १०० खाटा करण्यात आल्याची माहिती श्री.मुगळीकर यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे आता पर्यंत तीन रूग्ण आढळून आले आहेत. या पैकी एका रूग्णावर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोन रूग्णांवर परभणीतील शासकीय रूग्णालय व आयटीआय कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या रूग्णांसाठी लागणारे इंजेक्शनही प्रशासनाने मागवले असून ते उद्यापर्यंत प्राप्त होतील अशी माहिती श्री.मुगळीकर यांनी दिली. या तिन्ही रूग्णांची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी ऑक्सीजन प्लँट कार्यान्वित केला आहे. यावर ५० खाटांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही क्षमता आता १०० खाटा पर्यत नेण्यात आल्याचे श्री.मुगळीकर यांनी सांगितले. दरम्यान ऑक्सीजन प्लँट कार्यान्वित झाल्याने ऑक्सीजनची गंभीर समस्या संपुष्टात आली असून याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

.. बरे झाले व्यापातून सुटले : मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या