पूर्णा : दिल्ली येथील श्रध्दा वालकरच्या हत्येसह देशात ठिकठिकाणी झालेले हत्याकांड, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण सारख्या षडयंत्रणेला आळा घालण्यासाठी सकल हिंदू समाजातील नागरीक, महिला व युवतींनी बुधवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी शहरातील राममंदिर येथून मुक मोर्चा काढला.
शहरातील मुख्य रस्त्यावरुन झिरोफाटा टि पॉईंट येथे गेल्यानंतर लव्ह जिहाद व धर्मांतरण सारख्या षडयंत्रणेवर आळा घालण्या सबंधी मनोगत व्यक्त करुन देशात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी प्रशासना मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले. या मुक मोर्चात सकल हिंदू बांधवांसह महिला, युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, हिंदू मुलींना खोट्या प्रेमाने जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतरण करुन विवाह केल्याची बरेच प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे लव्ह जिहादच्या माध्यमातून हजारो हिंदू मुली धर्मांतरण करुन ईतर धर्मात पळवून नेल्या आहेत. बनवाबनवी करुन पळवून नेलेल्यापैकी काहींचे हत्याकांड घडले आहे.
अशा विघातक घटनांमुळे देश हादरुन जात असून या पार्श्वभुमीवर धर्मांतरण कायद्यावर कडक बंदी घालणे तात्काळ असल्याचे निवेदन नगर परिषद यांना देण्यात आलेÞ तसेच श्री बसवेश्वर चौक ते राम मंदिर रोडवर लागणारे फळगाडे यांचे अतिक्रमण काढून टाकावे. कॅरीबॅग बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे तयार करावेत. शहरातील रोडरोमिओवर त्वरित कारवाई करावी. शासकीय टॉवरवर कुठल्याही जातीचा झेंडा लावण्यात येऊ नये. दुकानातील घाण पाणी रस्त्यावर सोडणा-या दुकानदार यांच्यावर कारवाई करवी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. शहरातील व्यापा-यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. या मूक मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील हजारो समाज बांधवासह महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. या मुक मोर्चाच्या वेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.