26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीगंगाखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना गती द्या:आ.डॉ.गुट्टे

गंगाखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना गती द्या:आ.डॉ.गुट्टे

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : लॉकडाऊन च्या काळातही गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा विकास थांबू नये विशेषता ग्रामीण भागातील रस्त्याची कामे वेळेत पूर्णपणे करावीत रखडलेल्या कामाना गती देण्याचे आदेश आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाºयांचा सोबत बैठक देण्यात आले.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड पालम व पूर्णा या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना जोडणाºया रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम भेडसावणारा होता.याचे महत्व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी ओळखून ग्रामीण रस्त्यांचा परिपूर्ण विकास करणे अत्यंत गरजेचे असल्याने, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध गावांना जोडणारे रस्ते करण्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याने लवकरच अनेक गावांच्या रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. या बैठकीस आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, पी.एम.जी.एस.वाय. व एम.एम.जी.एस.वाय.परभणी चे कायर्कारी अभियंता भांगे,उपअभियंता बेंबाळकर व जे.ई. मिराज खान हे उपस्थित होते.

Read More  भारताच्या आॕलिम्पिक मोहिमेला धक्का ; ‘वाडा’कडून निलंबनात वाढ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या