पूर्णा : पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्यातील पोउपनि छगन किशन सोनावणे कर्तव्य बजावून पूर्णा येथे घरी परतताना नरहापुर शिवारात त्यांच्या कार उलटून होऊन अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
परभणी जिल्हयातील चुडावा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोउपनि छगन किशनराव सोनावणे हे दि. २४ जून रोजी आपले कर्तव्य बजावून स्वत:ची कार चालवत नांदेड पूर्णा रोडने पूर्णा येथील घरी येत होते. तेंव्हा अचानक कारचा ताबा सुटल्याने नरहापुर शिवारात त्यांची कार उलटली. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन त्यांना पूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. छगन सोनावणे यांची पोउपनिपदी नुकतीच पदोन्नती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले आहेत.