28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीसचिन पाटील यांच्या खूनी आरोपीस पकडले

सचिन पाटील यांच्या खूनी आरोपीस पकडले

एकमत ऑनलाईन

परभणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा मंगळवार, दि़ ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपी विजय जाधव यास पोलिसांच्या पथकाने सेलू रेल्वेस्थानक परीसरातून सोमवार, दि़ १२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे.

वसमत रोडवरील शिवराम नगरमध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील मंगळवारी रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. यावेळी एका मित्रासोबत त्यांचा वाद झाला होता. यावेळी त्यांच्या तीष्ण हत्याराने वार केल्याने सचिन पाटील गंभीर जखमी झाले होते़ घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते़ यावेळी पोलिसांना सचिन पाटील यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार केल्याचे आढळून आले होते.

यावेळी मित्र व भावाने सचिन यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले होते परंतू मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल होवून आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना झाली होती. दरम्यान पोलिसांच्या पथकाने सोमवारी सेलू येथून आरोपी विजय जाधव यास ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या