22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीपावत्याविना घेतली प्रवेश फीस पालकांची शिक्षणाधिका-यांकडे धाव

पावत्याविना घेतली प्रवेश फीस पालकांची शिक्षणाधिका-यांकडे धाव

एकमत ऑनलाईन

परभणी : शालेय शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षासाठी शाळेत प्रवेश घेण्यात आला. शाळेच्या नियमानुसार प्रवेश फीस सह अन्य शुल्क संस्थेने भरणा करून घेतली. एकूण रक्कमेपैकी केवळ ३६० रुपयांचीच पावती पालकांच्या हातावर ठेवण्यात आली. वारंवार मागणी करूनही संस्थेने भरलेल्या रक्कमेची पावती अद्यापर्यंत न दिल्यामुळे पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्धारे धाव घेऊन पावत्यांची मागणी केली आहे.

सेलू येथील नूतन विद्यालय या शाळेत सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात नियमांचे उल्लंघन करून आव्वाच्या सव्वापट फीस वसुल करण्यात आली. या भरलेल्या रक्कमेच्या पावत्या अद्यापपर्यंत देण्यात आल्या नसल्यामुळे या शाळेतील पालकांनी पावत्या मागणीचे निवेदन मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी अधिकारी येरमाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ, यांना २२ जुलै रोजी देण्यात आले आहे. गत वर्षी देखील नूतन विद्यालय या शाळेत सर्व नियम धाब्यावर बसवुन मोठ्या प्रमाणात फीस वसुली केली होती.

विशेष म्हणजे पालकांनाकडून प्रवेशाच्या नावाखाली घेतलेल्या रकमेच्या कुठल्याच प्रकारच्या पावत्या देण्यात आल्या नव्हत्या. पालकांनी वारंवार या संदर्भात मुख्याध्यापक व संस्थाचालक यांना पावत्याची मागणी केली. परंतु प्रत्येकवेळी मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी सत्र संपले तरी देखील पालकांनी भरलेल्या फीसच्या पावत्या न मिळाल्याने आज निवेदन देऊन पावत्या देण्याची मागणी केली आली. या निवेदनावर सतीश जाधव, पालक शिक्षक संघ सदस्य अनिल आवटे, रामेश्वर रंवदळे, विजय बोकन, दीपक मोरे, दासुपंत काळे, गणेश वाघ आदी पालकांच्या स्वाक्षºया आहेत.

Read More  बेड अभावी मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी : क्षीरसागर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या