24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeपरभणीखा.जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत

खा.जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : परभणीचे खा. संजय जाधव यांच्या राजीनाम्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष उफाळला असून कार्यकर्त्यासाठी स्वत:च्या पदाचा राजीनामा देणारे राज्यातील नव्हे तर देशातील पहिले लोकप्रतिनिधी असल्याच्या भावनेतून शिवसेनेचे पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात मोठा वाटा असणारे खा. संजय जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शिवसैनिकांची नावे प्रशासक म्हणून घ्यावीत अशी विनंती पक्षाकडे केली होती.जिल्ह्यात विधानसभा सदस्यांमध्ये एकही सदस्य राष्ट्रवादीचा नसताना राष्ट्रवादीच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जाण्याचे संकेत दिसू लागल्याने शिवसैनिकांवर अन्याय होत आहे.

या भूमिकेतून परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला होता.या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली.असतानाच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमाकूळ घालत खा.जाधव यांना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देत शिवसैनिकांवर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम केले आहे.

गावपातळीवरील शिवसैनिक या अन्यायापासून सुटू शकलेला नाही.यातच खासदार जाधव यांनी शिफारस केलेल्या नावांना विरोध करत मर्जीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे षडयंत्र होत असतानाच खासदार जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला होता. जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी या राजीनाम्याला पाठिंबा दर्शवत आमचा नेता!आमचा स्वाभिमान!ही टॅगलाईन करून राजीनामा देणार असल्याचे सुचवले आहे.

ऑपरेशनदरम्यान पोटात टॉवेल राहिल्याचा धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या