25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीशेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्­थान हवे : डॉ सुभाष पुरी

शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्­थान हवे : डॉ सुभाष पुरी

एकमत ऑनलाईन

परभणी : देश कृषि तंत्रज्ञानाच्­या आधारे शेतकरी बांधवाच्­या परिश्रमातुन अन्­नधान्­यात स्­वयंपुर्ण झाला. देशाने अन्­नधान्­य उत्­पादनात उच्­चांक गाठला. परंतु शेतकरी बांधवाच्­या उत्­पन्­नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. शेतक-यांपेक्षा शेतमालाचे व्­यापारी मोठे होत आहेत, शेतकरी कुटुंबांतीलच एखादी तरी व्­यक्­ती शेतमाल व्­यापारी झाली पाहिजे. आज युवा पिढी शेती व्­यवसायाकडे येत नाही. शेती करणा-या युवकांना समाजात मानाचे स्­थान दिले जात नाही. शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्­थान मिळाले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलण्­याची गरज असल्­याचे प्रतिपादन इम्­फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्­या सुवर्ण महोत्­सवी जयंती निमित्­त विस्­तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्­ट्र शासन यांच्­या संयुक्­त विद्यमाने दि.१८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्­याच्­या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते तर व्­यासपीठावर शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ.दत्­तप्रसाद वासकर, विस्­तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ.धिरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी रेणवसिध्­द लामतुरे, मुख्­य शिक्षण विस्­तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुरी पुढे म्­हणाले की, आज देशातील गोदामे अन्­नधान्­याने भरली असल्­याने देशात शांती आहे. अन्­यथा श्रीलंके सारखी स्थिती झाली असती. श्रीलंकेत कोणताही विचार न करता रासायनिक खत व औषधावर बंदी करून सेंद्रीय शेती करण्­याचे बंधन शेतक-यांवर लादले, तेथे अन्­नधान्­याची मोठी कमतरता नि­र्माण झाली. सेंद्रीय शेतीचे धोरण अभ्­यासपुर्णपणे राबविण्­याची गरज आहे. शेती निविष्­ठाच्­या दरात मोठी वाढ होत असुन उत्­पादन खर्च वाढत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत आहे, यावर संशोधनाच्­या आधारे मार्ग काढावे लागतील.

अध्­यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्­हणाले की, कृषि तंत्रज्ञानाने देशात हरित क्रांती व धवल क्रांती झाली. परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे अनेक वाण विकसित केले असुन अनेक तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांना दिला आहेत. मागील पन्­नास वर्षात मराठवाडयातील कृषी विकासात विद्यापीठाचे भरीव असे योगदान आहे. विद्यापीठावर शेतकरी बांधवांचा मोठा विश्­वास आहे. विद्यापीठातील पन्­नास टक्क्यांपेक्षा जास्­त प्राध्­यापक व शास्­त्रज्ञांची पदे रिक्­त असुन दर्जेदार कृषि शिक्षण व संशोधना करिता विद्यापीठातील ही पदे भरणे गरजेचे आहे. कोरोना रोगाच्­या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीतही शेती व शेतकरी थांबला नाही. कोठेही शेतमालाचा तुटवडा जाणवला नाही की शेतमालाची भाव वाढ झाली नाही. शेतकरीही कोरोना योध्­दा प्रमाणे अविरत काम करत होता, असे मत त्­यांनी व्­यक्­त केले.
प्रगतशील शेतकरी अभिमान आवचर म्­हणाले की, शेतकरी बांधवाचा कृषी विद्यापीठावर मोठा विश्­वास असुन शेतीतील शाश्­वत उत्­पादन वाढीचे तंत्रज्ञान विद्यापीठानेच शेतक-यांना दिले आहे.

कार्यक्रमाच्­या प्रास्­ताविकात डॉ.देवराव देवसरकर म्­हणाले की, विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांमध्­ये प्रचलित असुन मराठवाडयात सोयाबीन व तुर पिकांच्­या वाणाची मोठी लागवड केली जाते. बदलत्­या हवामानात आंतरपिक पध्­दती, एकात्मिक किड-रोग व्­यवस्­थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात शासन पुरस्­कार प्राप्­त शेतीनिष्­ठ शेतकरी बांधवांचा मान्­यवरांच्­या हस्­ते शाल, श्रीफळ देऊन सत्­कार करण्­यात आला. मेळाव्­यात आयोजित खरीप पिक परिसंवादात विविध विषयावर विद्यापीठ शास्­त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद दिला. मान्­यवरांच्­या हस्­ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्­यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.सुनिता पवार, डॉ.प्रितम भुतडा, डॉ.अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्­य विस्­तार शिक्षणाधिकारी डॉ.प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्­यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्­तारक, विद्यापीठातील प्राध्­यापक, शास्­त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्­येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या