18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीकृषिमंत्र्यांना शेतक-यांच्या भावना कळत नाहीत : विरोधी पक्षनेते दानवे

कृषिमंत्र्यांना शेतक-यांच्या भावना कळत नाहीत : विरोधी पक्षनेते दानवे

एकमत ऑनलाईन

परभणी : नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्री-अपरात्री कुठे दौरे केले व ते काय बोलेले हे सर्वांना माहित आहे. कृषीमंत्री जागेवर नसून त्यांना शेतक-यांच्या भावना कळत नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केल्यास शेतक-यांना अन्य सुविधांचाही लाभ मिळेल असे मत विरोधी पक्षनेते दानवे यांनी व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह शेतक-यांना पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावेत. शेतक-यांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिवार बाजार येथून निघालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले होतेÞ या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र वायकर, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतीताई ठाकरे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले होते.

या मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुढे बोलताना विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह पीकविमा आणि विजेच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहेÞ जायकवाडीचे पाणी शेतक-यांना मिळाले पाहिजे. यासाठी कालवा समितीची बैठक घेणे आवश्यक असते परंतू पालकमंर्त्यांना यासाठी अजूनही वेळ मिळाला नसल्याचा टोला त्यांनी यावेळी मारलाÞ पालकमंत्री नसतील तर मुख्य अभियंता यांच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात यावीÞ शेतक-यांना पाणी दिसत आहे परंतू ते त्यांच्या शेतापर्यंत पोहचू शकत नाही. या संदर्भात बैठक घेवून शेतक-यांना जायकवाडीचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

तसेच पीकविमा संदर्भात पीकविमा कंपन्यांना जाब विचारला आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाच शेतक-यांनी पीकविमा भरलेला असताना २ लाख ६० हजार शेतक-यांना विमा रिजेक्ट करण्यात आला आहे. परंतू आता जवळपास साडेचार लाख शेतक-यांना पीकविमा मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहेÞ हे शिवसेनेच्या धडक मेर्चाामुळे शक्य झाले असून शेतक-यांना पीकविमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते दानवे यांनी यावेळी बोलताना दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या