परभणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेकडो शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिल्याचा निषधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि़. २७) कृषि अधिक्षक अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी सर्व शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा मिळेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिला नाही त्यांनाही सरसकट पीकविमा मिळेल, असे आश्वासन कंपनी व कृषि विभाग अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, धर्मेंद्र तुपसमिंद्रे, वैभव संघई, उद्धव गरुड, हनुमान गरुड, पांडुरंग गरुड, कुंडलिक गरुड, नागनाथ गरुड, तुकाराम गरुड, ज्ञानोबा गरुड, त्रिंबकराव गरुड, विष्णु गरुड, बाळू गरुड, तुकाराम गरुड, नरहरी गरुड, दत्तराव राऊत, सुभाष राऊत, मारोती गरुड यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांच्या कार्यालयात जाऊन रिलायन्स या पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना धारेवर धरले. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत तक्रारी दिल्या त्या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ पिकविमा मिळेल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलक शांत झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यालय परिसर दणाणून सोडण्यात आला.