परभणी : सिकंद्राबाद ते मनमाड दरम्यान धावणारी अजिंठा एक्स्प्रेस उद्या मंगळवार दि.१ डिसेंबर पासून सुरु होत आहे. तर पूर्णा-पटना आणि हैदराबाद -जयपूर विशेष रेल्वे गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे. या तिन्ही गाड्यांच्या वेळेत बदल केला असून नंदीग्राम विशेष एक्स्प्रेसमध्ये तीन अधिकचे डब्बे जोडण्यात आले आहेत. दक्षीण मध्ये रेल्वे विभागाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे रेल्वेच्या प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.
गाडी संख्या ०७०६४ सिकंदराबाद ते मनमाड धावणारी अजंठा विशेष गाडी दि.१ डिसेंबर रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६.५० वाजता सुटेल. ही गाडी नांदेड येथे रात्री १२.२२, औरंगाबाद सकाळी ५.४० तर मनमाड येथे सकाळी ०८.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७०६३ मनमाड – सिकंदराबाद अजंठा विशेष गाडी दि.२ डिसेंबर २०२० रोजी मनमाड रेल्वे स्थानकावरून रात्री ८.५० वाजता सुटेल. ही गाडी औरंगाबाद येथे रात्री १०.४५, नांदेड पहाटे ३.०५ तर सिकंदराबाद येथे सकाळी ०८.५० वाजता पोहोचेल. गाडी संख्या ०२७२० हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी दि.२ ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री ८.२५ वाजता सुटेल आणि नांदेड -०१.२०, हिंगोली ०३.२५, अकोला-०५.४५ मार्गे जयपूर येथे सकाळी ०५.२५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०२७१९ जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी दि.४ ते ३० डिसेंबर दरम्यान दर बुधवारी आणि शुक्रवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि अकोला- १५.२० हिंगोली, १७.००, नांदेड -१९.३० मार्गे हैदराबाद येथे मध्यरात्री ००.४५ वाजता पोहोचेल. गाडी संख्या ०७६१० पूर्णा ते पटना उत्सव विशेष गाडी दि.४ ते २५ डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी पूर्णा रेल्वे स्थानकावरून दुपारी २.१० वाजता सुटेल. नांदेड-२.४२, आदिलाबाद-६.२०, नागपूर-००.२५ मार्गे पटना येथे रात्री २३.२० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७६०९ पटना ते पूर्णा उत्सव विशेष गाडी दि.६ ते २७ डिसेंबर दरम्यान दर रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी ७ वाजता निघेल. ही गाडी नागपूर येथे पहाटे ४.३५, अदिलाबाद दुपारी १०.५५ तर पुर्णा येथे दुपारी ३.२५ वाजता पोहचणार असल्याचे रेल्वे विभागाकडून कळवण्यात आले आहे. नांदेड रेल्वे विभागाकडून अजंता एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना या गाडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
सूनेवर बलात्कार करुन मुलाची हत्या