परभणी : शालेय शिक्षण विभागाचा नव्याने काढण्यात आलेला पदोन्नती सेवा प्रवेश नियम रद्द करून जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक राजपत्रित गट आणि पदावर पुर्ववत पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहेÞ मागण्या पूर्ण न झाल्यास या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी शिक्षकांनी दिला
जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना मंगळवार, दिÞ१० जानेवारी रोजी निवेदन पाठविण्यात आले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शालेय शिक्षण विभागाचा २८ डिसेंबर २०२२चा उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदोन्नती सेवा प्रवेश नियम त्वरित रद्द करावाÞ या ऐवजी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा राजपत्रित गट आणि पदावर पूर्ववत पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
या निवेदनावर जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कृती समितीचे संभाजी खिलारे, राज्य सचिव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे सुमित लांडे, डीÞएसŸगोरे, युसूफ खान, अब्दुल वसीम, सूर्यवंशी, एसÞसीÞपलेवार, शिक्षिका एमÞजीÞभिसे, एसÞयुÞप्रधान, एसÞयुÞढगे, एसÞव्हीÞ चव्हाण आदींसह शिक्षकांच्या स्वाक्ष-या आहेत