24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeपरभणीगौर येथील मयत महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली

गौर येथील मयत महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

पुर्णा : तालुक्यातील गौर गावातील मयत एक महीला कोरोना बाधीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली.असून आरोग्य विभागाने सदर महिलेचा स्वाब अंत्यविधीची पूर्ण तयारी झाल्यानंतर घेतल्याने ग्रामस्था सह मयतीला उपस्थित नागरिकांची चिंता वाढली आहे

तालुक्यातील गौर येथील एका ५५ वर्षीय कॅन्सरग्रस्त महीलेचा बुधवार १२ ऑगस्ट रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता.गौर गावात दोन दिवसांपूर्वी त्या मयत महीलेच्या कुटुंबातील एक ९० वर्षीय महीला व २४ वर्षीय पुरुष परभणी जिल्हा रुग्णालयात बाधीत आढळून आले होते.गौर येथे प्रतिबंध क्षेत्रात एक व्यक्ती मयत झाल्याचे येथिल उपकेंद्राला समजताच याची माहिती तृयांनी पुर्णा आरोग्य विभागास कळवली.

रात्री आरोग्य विभागाचे टिम गावात दाखल झाली.त्यामयत महीलेच्या अंत्यवीधीसाठी सर्व तयारी उपस्थीतांनी उरकली होती.त्याचवेळी येथे आरोग्य पथकाने तीच्या मृत्यू पश्चात तीची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब तपासणी साठी घेतले.दरम्यान उपस्थितांनी सदरील महीलेला रितीरिवाज पुर्ण करुन अंत्यविधी घेऊन गेले.एकीकडे अंतीम संस्कार पार पडला न पडलाच आरोग्य विभागाच्या वतीने ती महीला कोरोना बाधीत असल्याचे जाहीर केले.यावेळी उपस्थित असलेल्या मध्ये एकच गोंधळ उडाला.

दानवेंच्या जावयाचा घटस्फोटासाठी अर्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या