22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन

ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन

एकमत ऑनलाईन

परभणी : सद्या कोरोना महामारीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे सण उत्सव घरीच साजरी करण्याची वेळ आली असून येणारी बकरीईद मुस्लीम बांधवानी घरच्या घरी साजरी करून मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज ही घरीच अदा करण्याचे आव्हान गंगाखेडचे उप.वि.अधिकारी सुधीर पाटील यांनी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यात पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्यक्ष,जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, अनेक विभागाचे अधिकारी कमचारी उपस्थित होते. त्याच प्ऱमाणे शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यातही २९ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील प्रतिष्ठीत नागरिक,मौलाना, नगरसेवकांनी बैठक आयोजीत करण्यात आली होती. पुर्णेतही बकरी ईद निमित्त शहरातील सुमन मंगल कार्यालयात २९ जुलै रोजी दु ३.३० वाजता शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी व्यासपीठावर तहसीलदार वंदना मस्के,पो नि भूमे,जामा मशिदीचे पेशींमाम शमीम रिजवी उपस्थित होते. बैठकीत पुढे बोलताना उप वि अधिकारी सुधीर पाटील म्हणाले की,शासनाने सण उत्सव साठी प्रतिबंधक उपाय सांगितले आहे सण साजरे करा बकरिद ईद च्या निमित्ताने ईदगाह मशिद, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन नमाज अदा करता येणार नाही,घरच्या घरी ईद साजरी करताना संनटाईजस,मास्क फिजिकल डिस्टन्स ठेवून शासनाच्या नियमाचे पालन करत ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.

Read More  अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर चाकू हल्ला

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या