26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीशाळा खोल्यांच्या बांधकामासह शिक्षकांची नियुक्ती होणार

शाळा खोल्यांच्या बांधकामासह शिक्षकांची नियुक्ती होणार

एकमत ऑनलाईन

परभणी : जोडपरळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे बांधकाम तात्काळ सुरू होणार असून शिक्षकांच्या नियुक्तीही होणार असल्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन तात्पुरते स्थगिती करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जि़प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून तालुक्यातील जोड परळी येथील तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या निझामकालीन खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले होते.

परंतु जिल्हा परिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मागील वर्षी मंजूर झालेले वर्ग खोल्यांचे बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. मंजूर नवीन वर्गखोल्या तात्काळ बांधण्यात याव्यात तसेच वर्ग पहिली ते आठवी अश्या आठ वर्गासाठी केवळ पाच शिक्षक असून उर्वरित चार रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत अन्यथा जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये दि़. २२ जुलै रोजी ठीया आंदोलनाचा इशारा दिला होता.

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दखल घेऊन या संबंधीत प्रश्नाबाबत जबाबदार असणा-या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व शिक्षणाधिकारी यांना संबंधीत मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या नुसार दि. १९ जुलै रोजी बांधकाम विभागाचे अभियंते व शिक्षण विभागाच्या पथकाने जोड परळी येथील शाळेचा दौरा करून अहवाल सादर केला.

दि़ २१ जुलै रोजी संबंधीत अधिका-याची प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व पदाधिका-या सोबत बैठक घेण्यात आली़ यात बांधकाम विभागाच्या वतीने जोड़ परळी येथील जि़प़शाळेच्या मंजूर व रखडलेल्या खोल्यांचे बांधकाम तात्काळ सुरू करण्या संबंधीत ठेकदारांना व अभियंत्यांना लेखी सूचना देण्यात आल्या. तसेच शिक्षण विभागामार्फत संबंधीत शाळेतील शिक्षकांच्या रिक्त चार जागांपैकी एक जागेवर तात्काळ नियुक्ती करणे व उर्वरित तीन रिक्त नियुक्त्या पंधरा ते वीस दिवसात करणे बाबत लेखी सूचना देण्यात आल्या.

या दोन्ही प्रकरणामध्ये तात्काळ कारवाही करण्याचे लेखी आश्वासन दोन्ही विभागामार्फेत प्रहार जनशक्ती पक्षास मिळाल्या नंतर व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विनंती नंतर व लेखी आश्वासना नंतर प्रहार जनशक्ती पक्षाने दि. २२ जुलै रोजी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात होणारे ठिया आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या