22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीसाईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी

साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी

एकमत ऑनलाईन

परभणी : पाथरी येथील श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शुक्रवारी दि.०४ रोजी मुंबईत आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीतून मंजूरी बहाल करण्यात आली आहे. मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव सिताराम खुंटे यांच्या दालनात शुक्रवारी आयोजित केलेल्या या उच्चस्तरीय बैठकीस आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, नगरविकास खात्याचे उपसचिव तसेच पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, राजेंद्र विश्‍वामित्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

याप्रसंगी १४ फेबु्रवारी २०२० रोजी उच्चाधिकारी समितीच्या बैठकीतील चर्चेअंती व आवश्यक ते फेरबदल करुन श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करण्यात आला. बैठकीतून मंदिराकडे जाणारे रस्ते बारा ऐवजी नऊ फुटाचे करावेत, एवढा बदल सुचवून व त्यास मान्यता देवून आराखडा पुढील मंजूरीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत आराखड्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आ.दुर्राणी यांनी दिली.

मराठा आरक्षण: विधी तज्ञांच्या समितीचा अहवाल सरकारला सादर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या