26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीकृषी सहाय्यक पदोन्नतीचे प्रमाण २५ टक्के करण्यास मंजूरी

कृषी सहाय्यक पदोन्नतीचे प्रमाण २५ टक्के करण्यास मंजूरी

एकमत ऑनलाईन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदानेन्तीचे प्रमाण १५ टक्केवरून वाढवून २५ टक्के करण्याचा ठराव आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आज झालेल्या विद्यापीठ कार्यकारी परीषदेच्या बैठकीत मांडला होता. या बैठकीत कुलगुरू, कुलसचिव व सर्व सदस्यांनी या ठरावास सर्वानुमते सहमती दर्शवत मंजुरी दिली. या निर्णयाचा विद्यापीठातील भरपूर कर्मचा-यांना फायदा होणार आहे.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सद्यस्थितीत कृषी सहाय्यक संवर्ग पदोन्नतीचे प्रमाण १५ टक्के आहे़ या उलट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी येथे पदोन्नतीचे प्रमाण २५ टक्के आहे़ राहूरी विद्यापीठाप्रमाणे वनामकृवितील कृषी सहाय्यक पदोन्नतीचे प्रमाण १५ टक्केवरून २५ टक्के करण्यात यावे अशी मागणी आमदार डॉ़राहूल पाटील यांच्याकडे विद्यापीठातील कर्मचा-यांनी निवेदनाद्वारे केली होती़ या निवेदनात सद्यस्थितीत शासनाने सरळसेवेने पदे भरण्याकरीता निर्बंध घातले असून निर्बंध कालावधीत निश्चित केलेल्या प्रमाणानुसार पदभरती करण्यास अत्यंत कमी पदे उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच नव्याने भरती होणा-या उमेदवारांना कामाचा व प्रशासनाचा अनुभव येण्यासाठी काही काळाची आवश्यकता असते़ तसेच सरळसेवेचे भरतीचे प्रमाण कमी करून पदोन्नती भरतीचे प्रमाण वाढल्यास प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे वर्ग ३ व ४ मधील उच्चशिक्षीत व अनुभवी कर्मचारी विद्यापीठास मिळत असल्यामुळे कृषी सहाय्यक या पदाचे पदोन्नतीचे प्रमाण १५ टक्के वरून वाढवून २५ टक्के करण्यात यावे अशी मागणी कर्मचा-यांनी निवेदनातून केली होती़ पदोन्नतीचे प्रमाण वाढवण्याचे अधिकार कुलगुरू यांना आहेत.

त्या अधिकाराचा वापर कर्मचारी हितासाठी करून राहूरी कृषी विद्यापीठाप्रमाणे वनामकृवितील पदोन्नतीचे प्रमाण १५ टक्के वरून वाढवून २५ टक्के करण्यात यावे अशी मागणी गट क व ड मधील सर्व कृषी सहायक पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचा-यांनी केली होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शुक्रवार, दि. २ सप्टेंबर रोजी झालेल्या विद्यापीठ कार्यकारी परीषदेच्या बैठकीत आमदार डॉ़राहूल पाटील यांनी वरील विषयाच्या अनुषंगाने राहूरी व वनामकृवि दोन्ही कृषी विद्यापीठ एक सारखे असताना राहूरी व वनामकृवि कृषी विद्यापीठ कर्मचा-यांसाठी पदोन्नतीचा कायदा वेगवेगळा का? असा सवाल उपस्थित केला.

तसेच ही तफावत तात्काळ दूर करून कर्मचा-यांना न्याय द्यावा अशी मागणी केली़ या मागणीची तात्काळ दखल घेत कुलगुरू, कुलसचिव व सर्व सदस्यांनी कृषी सहाय्यक पदोन्नतीचे प्रमाण १५ टक्केवरून वाढवून २५ टक्के करण्याच्या निर्णयास सर्वानुमते मंजुरी दिली़ या निर्णयाचा विद्यापीठातील अनेक कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी फायदा होणार आहे़ या निर्णयाबद्दल वनामकृविचे कर्मचारी सतिश पुंड, शिवाजी मुटकुळे, अमोल शितळे, श्रीधर कदम, रघुनाथ थोरात, सोनु दुबे, व्यंकट राठोड, श्रीराम वाघमारे यांच्यासह असंख्य कर्मचा-यांनी आमदार डॉ. राहूल पाटील यांचे आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या