परभणी : कोरोनाच्या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मनपा हद्दीत दहा ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींसाठी एक हजार १८२ बेडची व्यवस्था केल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी बी.रघुनाथ सभागृहात सोमवार १७ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कृषी विद्यापीठातील वसंत वसतीगृहात २५०, शेतकरी भवनात १५० व ७२, रेणुका मंगल कार्यालयात शंभर, विद्यापीठातंर्गत एन.आर.आय. वसतीगृहात १०, दिवाकर रावते मुलींच्या वसतीगृहात ५० बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या सेंटरमधून दोन वेळस सकस व पौष्टीक जेवणासह दोन वेळेस चहा, दुध, बिस्कीट व नाश्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सॅनिटाय्झर तसेच आवश्यक असणा-या सर्व बाबी.त्यात बेड, गादी, पिण्याची पाणी, सांडपाणी, बकेट, मग, तेल, कंगवा, आरसा, सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त यांची नेमणुक करण्यात आली आहे. दररोज दोन वेळा वैद्यकीय अधिका-या मार्फत वैद्यकीय तपासणीत करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली.
सहा रुग्णालयात १७० बेड- शहरातील एकूण सहा खासगी रुग्णालयात एकूण १७० बेडची व्यवस्था प्रस्थापीत असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली. आयटीआयच्या इमारतीत २००, नेत्र रुग्णालयात ४०, लाईफ लाईन हॉस्पीटलमधून 12, नावंदर हॉस्पीटलमधून ४०, अबोली हॉस्पीटलमधून पंधरा, गणेश नेत्रालयात दहा, पी.डी.होमिओपॅथीक महाविद्यालयात ४३ व प्राईम हॉस्पीटलमधून ५० बेडची व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
मनपाने ५३० कमर्चारी नियुक्त केले आहेत ही बाब निदशर्नास आणून देत महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील १६ प्रभाग निहाय १६ आरआरटी(तात्काळ शिघ्रपथक) तयार केले आहे. त्यात २४ अधिकारी, २६० आरोग्य कमर्चारी व २८० इतर कमर्चारी नियुक्त केले आहेत, असे आयुक्त देविदास पवार म्हणाले.
१७३ झोनमधून सर्वेक्षण पूर्ण
महानगरपालिका हद्दीतील १७३ प्रतिबंधीत क्षेत्रात प्रशासनानेद्वारे १६२ टीमद्वारे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून १७ हजार २८० नागरिकांची चौदा दिवसांत आठ वैद्यकीय अधिकारी यांच्या सर्वेक्षणाखाली सर्वेक्षण केल्या गेल्यानंतर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणा-या एक हजार १९८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
बीड: मराठा समन्वयक समितीकडून राज्यभर आंदोलन