37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeपरभणीतेरा कोरोना रूग्ण सापडल्याने आर्वी गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

तेरा कोरोना रूग्ण सापडल्याने आर्वी गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

एकमत ऑनलाईन

परभणी : तालुक्यातील आर्वी गावात गुरुवारी (दि.४) 13 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने आर्वी ग्रामपंचायत हद्द प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. एकदाच एवढे रूग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

आर्वी गावातील 13 व्यक्ती गुरुवारी कोरोनाबाधित आढळल्या. शासनाच्या कंटेंटमेंट प्लॅनमधील सूचनानुसार आर्वी ग्रामपंचायत हद्द गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दी ग्रामपंचायत व संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख यांनी सील करायच्या आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व वैद्यकीय सेवा सुरळीत राहण्याकरिता ग्रामपंचायत, आरोग्य विभाग कर्मचारी व त्यांचे वाहने वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास बंदी केली आहे.

पार्डीच्या शेतक-यांनी मिळविले टरबूजाचे विक्रमी उत्पादन; दिड एकरात दोन लाखांचे उत्पन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या