24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीबाजारपेठा उघडताच सोशल डिस्टेन्सींगचा उडाला फज्जा

बाजारपेठा उघडताच सोशल डिस्टेन्सींगचा उडाला फज्जा

एकमत ऑनलाईन

जिंतूर : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जीवनाश्यक वस्तूंची सेवा वगळता इतर सर्व दुकाने व प्रतिष्ठांन दोन महिन्यापासून बंद ठेवण्याचे निर्बंध जिल्हा प्रशासनाने लावले होते. अनलॉकच्या नियमानुसार सोमवार दि.७ पासून बाजारपेठा सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा उघडताच नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. विशेषत: मंगळवारी आठवडी बाजार असल्याने सोशल डिस्टेन्सींगचा फज्जा उडाला होता.

सोमवार पासून बाजारपेठा उघडल्याने व्यापारी वर्गात आनंदी वातावरण दिसून येत होते. लहान, मोठे व्यापारी, दुकानदार यांनी नव्या उमेदीने व्यवसाय सुरू केले. तर व्यापारीपेठा उघडल्यामुळे शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, मध्यवर्ती चौक, भाजी मंडई, येलदरी रोड, मोंढा रोड, मार्केट यार्ड या भागासह प्रमुख रस्त्यांवर जागोजागी वाहतूकीची कोंडी होत आहे. यात मंगळवार हा आठवडी बाजारचा दिवस असल्याने गर्दीत मोठी भर पडली. त्यामुळे सामाजिक अंतराचा मात्र फज्जा उडाला. मास्क लावणे बंधनकारक असताना अनेकांनी मास्क लावले नव्हते. प्रशासनाने अशा बेजाबदारपणे वागणा-यां नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सीरम, भारत बायोटेकला केंद्राकडून लसींची ऑर्डर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या