21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeपरभणीपँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर प्राणघातक हल्ला

पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर प्राणघातक हल्ला

एकमत ऑनलाईन

सेलू : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर सेलू येथील रायगड कॉर्नरवर रात्रीच्या वेळेस काही लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या प्रकरी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी प्रकरणाची सर्व माहिती घेऊन आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी झालेल्या भाषणात आरोपींना त्वरीत अटक करण्याची करण्यात आली. या निषेध मोर्चामध्ये दलित समाजाचे कार्यकर्ते अशोकराव अंभोरे, मिलिंद सावंत, अ‍ॅड.विष्णू ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमा झाला होता.

साकव मैत्रभावाचा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या