25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeपरभणीपरभणी ग्रामीण भागात एप्रिल अखेर ३२० कोरोना बाधितांचा मृत्यू

परभणी ग्रामीण भागात एप्रिल अखेर ३२० कोरोना बाधितांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या चिंता निर्माण करणारी ठरली आहे. जिल्ह्यात 30 एप्रिल अखेर शहरी भागात 569 तर ग्रामीण भागातील 320 असे एकूण 889 कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू पावले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी आरटीपीसीआर तपासणीसाठी आता पुढाकार घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर सुरूवातीस म्हणावा तेवढा प्रभाव दिसला नाही. परंतू मार्च महिन्यापासून वातवरण चिंताजनक बनले. एप्रिल महिन्यात मात्र परीस्थिती अटोक्याबाहेर गेल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाबाधित मृत्यू पावलेल्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढील प्रमाणे. परभणी तालुका- शहरी भाग 374, ग्रामीण भाग 88 असा 462 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंगाखेड तालुका- शहरी भाग 41, ग्रामीण भाग 30 असे एकूण 71. जिंतूर तालुका- शहरी भाग 28, ग्रामीण भाग 41 असे एकूण 69.

पूर्णा तालुका- शहरी भाग30, ग्रामीण भाग 37 असे एकूण 67. पाथरी तालुका- शहरी भाग 28, ग्रामीण भाग 23 असे एकूण 51, मानवत तालुका- शहरी भाग 25, ग्रामीण भाग 25 असे एकूण 50. सेलू तालुका- शहरी भाग 16, ग्रामीण भाग 21 असे एकूण 37, सोनपेठ तालुका- शहरी भाग 5, ग्रामीण भाग 12 असे एकूण 17. तसेच अन्य शहरी भाग 11, ग्रामीण भाग 25 असे एकूण 36 रुग्ण असणा-या व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च पासून कोरोनाची लाट आल्यापासून शहरी भागात 569 व ग्रामीण भागात 320 असे एकूण 889 व्यक्तीं कोरोनाच्या आजाराने मृत्यू पावल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी; डब्ल्यूएचओकडून मान्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या