24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीमानवतमध्ये वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा

मानवतमध्ये वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा

एकमत ऑनलाईन

मानवत : मानवत तालुक्यातील ५४ गावांतील नागरीकांचा दैनंदिन कामकाजाच्या निमित्ताने मानवत शहराशी संपर्क येत असतो. परंतू शहरातील वाढते अतिक्रमण, लहान व्यावसायिकांना रस्त्यावरच मांडलेले बस्तान व त्यातच अवजड वाहनांचा शहरातून मुक्तपणे होणारा संचार यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील दुकानांपुढे बेशीस्तपणे वाहने पार्कींग करण्यात येत असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होत आहेÞ या वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न नगर परिषद प्रशासन सोडविणार का? असा सवाल सामान्य नागरीकांतून उपस्थित केल्या जात आहे.

मानवत शहरात लहान-मोठे व्यावसायीकांनी थेट रस्त्यावर आपले बस्तान मांडत अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. मानवत शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहराशी तालुक्यातील ५४ गावांतील नागरिक, शेतकरी, व्यापा-यांचा नेहमीचा संबंध येतो. शहरातील बाजारपेठ मोठी असल्याने पाथरी, सेलु, सोनपेठ या तालुक्यातील नागरीकांचाही नेहमीच मानवत शहरात ये-जा असते. तसेच कापसावर प्रक्रिया करणारा उद्योग मानवत शहराच्या आसपास असल्याने हजारो शेतकरी मानवत व्यापारपेठेत येत असतात. यामुळे शहरात नेहमीच वर्दळ पहावयास मिळते. अवजड वाहनांचा शहरात मूक्तसंचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

शहरातील व्यावसायीकांचे वाढते अतीक्रमण व वाहनांच्या गर्दीमुळे लहान व्यावसायीक देखील रस्त्यावर आल्याचे चित्र आहे. याकडे नगर परीषदेचे मुख्याधीकारी यांनी लक्ष देऊन शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

एसबीआय बँकेसमोरील वाहतूक कोंडी कधी सुटणार
मानवत शहरात एकच मुख्य रस्ता असल्यामुळे सर्व प्रकारची दुकाने या रस्त्याच्या दोन्ही बाजुने थाटली गेली आहेतÞ यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहर शाखे समोर व बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावरच गाड्या लावल्या जातात. यामुळे या ठिकाणी दिवसात किमान दहा ते बारा वेळा वाहतूक कोंडी होत असून हा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न उभा राहत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या