24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीपरभणीतून एटीएसने चौघांना घेतले ताब्यात

परभणीतून एटीएसने चौघांना घेतले ताब्यात

एकमत ऑनलाईन

परभणी : देशभरात देशविघातक कृत्य करणा-या संघटनांवर एनआयए, एटीएसकडून कारवाई करण्यात येत असून परभणीतूनही पीएफआय संघटनेच्या चार पदाधिका-यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे येथील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुरन २२/२०२२ कलम १२१(अ ), १५३ (अ), १२० (ब), १०९ भादंवि, सहकलम १३(१)(ब) यूएपीए गुन्ह्यासंदर्भात एटीएस नांदेड व औरंगाबाद येथील पथक परभणी शहरात पहाटे ५ ते ५.३२ च्या सुमारास दाखल झाले. या पथकाने विविध भागातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडयाच्या चार पदाधिका-यांना ताब्यात घेतले. दरम्यान नांदेड येथील एटीएसचे सपोनि डी. एस. शिंदे आणि औरंगाबाद येथील एटीएसचे सपोनि देशमुख यांच्या पथकातील कर्मचा-यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान या चौघांजणांना नांदेड येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान परभणीतून ताब्यात घेतलेले चारहीजण पीएफआय संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या