26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीकरविषयक कार्यशाळेला उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार जाहीर

करविषयक कार्यशाळेला उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार जाहीर

एकमत ऑनलाईन

परभणी : जी़एस़टी़पी़एम़मुंबई, करसल्लागार संघटना परभणी आणि सी़पी़ई़ चॅप्टर परभणी यांच्या संयुक्त विद्यमानेजीएसटी कायद्याला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर परभणी शहरात दि़०२ व ०३ जुलै रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती़ या कार्यशाळेला जी़एस़टी़पी़एम़मुंबई यांच्याकडून दिला जाणारा २०२१-२२चा उत्कृष्ट कार्यशाळा आयोजनाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे़ या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दि़१५ जुलै रोजी जी़एस़टी़पी़एम़ लायब्ररी, रूम नं़१०४, जीएसटी भवन कार्यालय, माझगाव (मुंबई) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे़

परभणी शहरात आयोजित कार्यशाळेच्या दुस-या दिवशीच्या प्रथम सत्रात सी़ए़प्रणव आष्टीकर व सी़ए़अरूण ओझा यांनी रिसेंट अ‍ॅमन्डमेंट इन कॅपीटल गेन व बेसीक कन्सेपट अ‍ॅन्ड प्रोसीजर ऑफ अ‍ॅन्टी मनी लॅन्ड्रीक लॉज इन इंडीया या विषयावर मार्गदर्शन केले़ दुपारच्या सत्रात अ‍ॅड़दिनेश तांबडे यांनी प्रोव्हीजन रिलेटींग टू इ-वे बील इनव्हायसींग अ‍ॅन्ड रेकॉर्ड किंपींग अंडर जीएसटी या विषयावर तर सी़ए़शाम धूत यांनी ऑपर्च्युनिटी इन इंडस्ट्रीयल सेक्टर अ‍ॅन्ड गव्हर्मेंट सपोर्ट या विषयावर मार्गदर्शन केले़.

या प्रसंगी औद्योगिक व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परभणीचे सी़ए़अ‍ॅड़प्रमोद एऩजाधव यांचा करसल्लागार संघटना व सीपीई चॅप्टरच्यावतीने मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी जी़एस़टी़पी़एम़मुंबईचे अध्यक्ष सी़ए़अलोक मेहता, कोषाध्यक्ष अ‍ॅड़प्रविण शिंदे, माजी अध्यक्ष अ‍ॅड़दिनेश तांबडे, कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड़विनोद मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती़.

कार्यशाळेच्या दुस-या दिवशीचे प्रास्ताविक राजकुमार भांबरे यांनी केले़ सुत्रसंचलन सी़ए़राधिका कासट, सी़ए़पुनम जाजू यांनी केले़ उपस्थितांचे आभार सी़ए़संतोष इंगळे यांनी मानले़ परभणी शहरातील उत्सव हॉल, एमआयडीसी, वसमतरोड या ठिकाणी आयोजित कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सी़पी़ई़चॅप्टर, करसल्लागार संघटनेचे सदस्य व प्रतिनिधी आदिंनी प्रयत्न केले़ या दोन दिवशीय कार्यशाळेला उत्कृष्ट कार्यशाळा आयोजनाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे पत्र जी़एस़टी़पी़एम़मुंबई यांनी पाठवले आहे़ या पत्रावर जी़एस़टी़पी़एम़मुंबईचे जॉइंट सेक्रेटरी सी़ए़महेश माडखोळकर, अ‍ॅड़पार्थ बदेका यांची स्वाक्षरी आहे़ या पुरस्कारामुळे परभणी करसल्लागार संघटना, सीपीई चॅप्टर परभणी यांच्या शिपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे़ या पुरस्काराबद्दल सी़ए़हिमांशु शहा, सी़ए़संतोष इंगळे, सी़ए़व्यंकटेश राहूलवार, सी़ए़रोहीत मंत्री, राजकुमार भांबरे, दिलीप जैन, सी़एक़ुशल गंगवाल, अ‍ॅड़श्रीकांत देशमुख, अ‍ॅड़विरेंद्र लाटकर यांच्यासह दोन्ही संघटनांच्या सदस्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या