27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीश्री गजानन महाराजांच्या पालखीत होतेय स्वच्छते विषयी जनजागृती

श्री गजानन महाराजांच्या पालखीत होतेय स्वच्छते विषयी जनजागृती

एकमत ऑनलाईन

परभणी : आषाढी एकादशी वारी निमित्त वारकरी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पालखी सोहळ्यात स्वच्छतेच्या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आधारित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात येत आहे.

रविवार दि. १९ जून २०२२ रोजी शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे. सदर पालखीत पोस्टर आणि स्वच्छता चित्ररथाच्या माध्यमातून वारकरी आणि नागरिकांना पाणी, आरोग्य, स्वच्छता, जल जीवन मिशन अशा विविध विषया बद्दल माहिती देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्वच्छता चित्ररथाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी स्वच्छतेच्या या उपक्रमाचे कौतुक करून जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन शिवानंद टाकसाळे यांनी केले.

यावेळी स्वच्छ भारत मिशन कार्यालयातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक परमेश्वर हलगे, क्षमता बांधणी तज्ज्ञ वनमाला कोरडे, संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, शालेय स्वछता तज्ज्ञ अविनाश आरळकर, संगणक चालक राजेंद्र कोचुरे यांच्यासह तालुकास्तरावरील गट समन्वयक, समूह समन्वयक यांची उपस्थिती होती. रविवारी संत गजानन महाराजांच्या पालखीने परभणी जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचा दुपारचा विसावा आणि रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी चित्ररथाच्या माध्यमातून जनजगृती करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या