Thursday, September 28, 2023

ग्लोबल एक्सलेंस पुरस्काराने अजमत खान सन्मानित

परभणी : फिल्म मीडिया बिझनेस अकॅडमी मुंबई तर्फे इस्कॉन, जुहू मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिने अभिनेते सुदेश बेरी यांच्या हस्ते दिग्दर्शक अजमत खान यांना ग्लोबल एक्सलेंस अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि पत्रकारांची उपस्थिती होती. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते आणि खलनायक प्रेम चोपडा, अभिनेते सुदेश बेरी, अनिल नायर, वैभव शर्मा, अभिनेत्री श्रेया, दीपशिखा, फॅशन डिझायनर नीता शर्मा, तनिषा, अर्चना कोचर, संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार, देशातील विविध भागातील नवोदित कलाकार, दिग्दर्शक, निर्माते व द केरला स्टोरीचे कलाकार उपस्थित होते.

अजमत खान यांनी संविधान एक रास्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच एकता सेवाभावी संस्थाचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र मीडियाचे ते संपादक आहेत. मुंबईतील कार्यक्रमात ग्लोबल एक्सलेंस अ‍ॅवार्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल अजमत खान यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या