34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeपरभणीआ. बाबाजानी दुर्राणी, आ.तानाजी मुटकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आ. बाबाजानी दुर्राणी, आ.तानाजी मुटकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी, भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी बुधवारी (दि.17) आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आ़दुर्राणी यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत. पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्य अधिकोष या गटातून दुर्राणी यांनी अर्ज दाखल केला आहे. आ़मुटकुळे यांनी हिंगोली विविध कार्यकारी सेवा सहकरी व धान्य अधिकोष गटातून अर्ज दाखल केला.

दरम्यान, बालासाहेब देसाई यांनी पूर्णा विविध कर्यकारी सेवाभावी संस्था या धान्यकोष गटातून अर्ज दाखल केला असून अरुण गुंडाळे व दत्तात्रय मायंदळे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. 15 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. त्यादिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. परंतु दुसरे दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सुरेश वडगावकर, गंगाधर कदम, पंडीतराव चोखट, अंबादासराव भोसले, आकाश चोखट, पांडूरंग डाखोरे, गणेशराव रोकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महसुलच्या कारवाईने येळी घाटातील रेतीमाफीया हादरले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या