27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeपरभणीबाजोरिया पिता-पुत्र शिंदे गटात दाखल

बाजोरिया पिता-पुत्र शिंदे गटात दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : शिवसेनेचे आमदार, खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सहभागी होत आहेत. मात्र तीस वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या परभणीत देखील फूट पडली आहे. परभणी विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. असे असले तरी जनतेतून निवडून आलेले आमदार आणि खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत.

परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत आजपर्यंत फूट पडली नव्हती. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद आमदार विप्लव बाजोरिया यांनीदेखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अभेद्य बालेकिल्ल्यात फूट पडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या