परभणी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय मÞराज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, महानगरपालिका परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय, जिल्हास्तरीय शहरी टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा परभणी क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रात पार पडल्या. या स्पर्धेत बालविद्या मंदिर, बालविद्या विहार व स्कॉटीश ऍकडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे १४ वर्षे मुले विजेता : बाल विद्यामंदिर शाळा परभणी, १४ वर्षे मुली विजेता : बाल विद्या विहार शाळा परभणी, १७ वर्षे मुले विजेता : बाल विद्या विहार शाळा परभणी, उपविजेता : एनव्हीएस मराठवाडा हायस्कूल परभणी, १७ वर्षे मुली विजेता : स्कॉटिश अकॅडमी परभणी, १९ वर्षे मुले विजेता : बाल विद्यामंदिर शाळा परभणी, उपविजेता : जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी, १९ वर्षे मुले विजेता : बाल विद्यामंदिर परभणी,
उपविजेता : श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय परभणी या शाळांच्या संघानी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना पदक देऊन गौरवण्यात आलेÞ या प्रसंगी शैलेंद्रंिसग गौतम, ज्ञानेश्वर पंडित, कैलास माने, अनिल मैड, कैलास टेहरे, विक्रम घोळवे, नितीन बिरादार, विक्रम हत्तेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुरज भुजबळ, पियुष रामावत, स्वप्निल अडसूळ, रोहित जोशी, तुषार जाधव यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेतून विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. १४ वर्षे मुले सांघिक विजेते : तनिष्कराज संजय प्रधान, आदित्य दत्ता जाधव, देवाशिष माणिकराव पवार, युवराज तुकाराम सवने, हुसैनखान गौसखान पठाण यांचा समावेश आहे. वैयक्तिक विजेतामध्ये स्मित रोशन करेवार, शिवनंदन मनोहर पुरी यांचा समावेश आहे. १४ वर्षे मुली सांघिक विजेते अंजली पाथ्रीकर, अनुष्का मैड, समृद्धी वट्टमवार, १७ वर्षे मुले विजेता सांघिक विजेते अनिकेत लक्ष्मीनारायण जोशी, ओमकार गणेश सोळंके, देवाशीष राजेश कदम, स्वराज बाळासाहेब रेंगें, रुद्र गोविंद टाक यांचा समावेश आहेÞ वैयक्तिक विजेतामध्ये अनुज आशिष कवठेकर, अक्षय आशिष कवठेकर, दर्शन संदीप
१७ वर्षे मुली सांघिक विजेते जान्हवी विक्रम घोळवे, ओवी महेश बाहेती, आर्या प्रवीण नाखले, सृष्टी संतोष दुधाटे, नीरजा नारायण कराड, १९ वर्षे मुले सांघिक विजेते शिवम गजानन सोनुने, श्रीपाद चिंतामणी कोठेकर, अवधुत कृष्णचंद्र कोठेकर, युवराज सुभाष काळे, पृथ्वीराज मोतीराम कदम तर वैयक्तिक विजेतामध्ये वरद लोहट, १९ वर्षे मुली सांघिक विजेते श्रावणी श्रीनिवास मोगरेकर, वेदा रणजीत राजे, सई सचिन इजाते, वैभवी प्रकाश गुंड, तन्वी श्रीराम सांगळ तसेच वैयक्तिक विजेतामध्ये मधुरा गोपाळ पुराणिक यांचा समावेश आहे. या सर्व यशस्वी खेळाडुंचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे.