22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीझरीतील बालाजी मंदिराचा होणार जिर्णोद्धार

झरीतील बालाजी मंदिराचा होणार जिर्णोद्धार

एकमत ऑनलाईन

झरी : झरी गावातील ऐतिहासिक, पुरातन वैभव असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी मंदीराचा जिर्णोद्धार होणार आहे. हे काम ०२ ते ०३ महिने सुरू राहणार असून यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी गावातील नागरीकांनी व भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

झरी येथील बालाजी मंदिर गावाच्या मधोमध असल्याने व मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने भाविकांकडून पंगत आदी कार्यक्रम येथे होत असतात. हे मंदिर गावाचा एक सांस्कृतिक वारसा असल्याने ह्या मंदिरावर गावातील लोकांची खूप श्रद्धा आहे. बालाजी मंदिरात प्रभु श्री रामचंद्र, सितामाता, लक्ष्मण, दक्षिणुखी हनुमान मंदिर व भगवान शंकर यांची मंदिरे आहेत़ त्यामुळे भाविक येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. मात्र हे मंदिर जुने व पावसाळ्यात काही ठिकाणी झिरपत असल्याने श्री बालाजी दुर्गा नवराञ महोत्सव व गावातील नागरिकांनी नवराञामध्ये जमा होणा-या देणगी मधुन इतर सर्व अनावश्यक खचार्ला फाटा देत महोत्सव समितीच्या बैठकीत मंदिराचा सभामंडप यांची दुरुस्ती करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

सभामंडप करण्याच्या कामासाठी गावातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन समस्त श्री बालाजी दुर्गा नवराञ महोत्सव समितीच्या पदाधिका-यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या