26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeपरभणीविहिंप व वारक-यांचे परभणीत भजन आंदोलन

विहिंप व वारक-यांचे परभणीत भजन आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी: वारीला विरोध, वारक-यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकाचा अपमान व जेष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदायातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. सरकारने आसमानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासाच्या बळाने वारक-यांवर जाणीवपूर्वक केलेले अत्याचार आहेत असे मत या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.

भर रस्त्यात वारक-यांना पारंपारिक गणवेश उतरवायला लावणे, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्माच्या पताकाची अवहेलना करणे, हरी भक्त पारायण निरपराध संताना अटक करणे, त्यांना अपराध्याची वागणूक देणे. जागोजागी वारक-यांची अडवणूक करणे त्यांच्यावर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. संविधानाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र बहाल केलेले आहे त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही. म्हणून विश्व हिन्दू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाद्वारे भजन आंदोलन करण्यात आले. जेष्ठ कीर्तनकार हभप बंडूतात्या कराडकर यांना व जागो जागी अडवणूक केलेल्या सर्व वारक-यांना सन्मान पूर्वक मुक्त करावे, त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठामध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, सप्ताह, कीर्तन, प्रवचने, दर्शन या वीस प्रतिबंध दूर करावे.

कार्यालयात, बस प्रवास, थिएटर किंवा हॉटेल मध्ये ५० % उपस्थितीला मान्यता दिली आहे तशी हा अनुष्ठांनांना अनुमती द्यावी, राज्य सरकारने वारकरी वर्गाच्या मागण्यासंर्दभात निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे, बजरंग दलाचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुनील रामपुरकर, महानगराध्यक्ष राजकुमार भांबरे, तुकाराम दैठणकर, गणेश काळबांडे, प्रसाद कुलकर्णी, मनीष देशपांडे, बापूराव सूर्यवंशी, भगवान पुरी, विश्वास दिवाडकर आदी उपस्थित होते.

अखेर ‘रोमियो’ भारतीय नौदलाला हस्तांतरीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या