22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeपरभणीभारत बंदला परभणीत जिल्ह्यात प्रतिसाद

भारत बंदला परभणीत जिल्ह्यात प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

परभणी : दिल्ली येथे शेतक-यांनी गेल्या दहा दिवसापासून सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुकारलेल्या भारत बंदला परभणी जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवल्यामुळे परभणी शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळाला. बंदच्या पार्श्वभुमीवर परभणी शहरासह जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परभणी शहरात सकाळपासूनच या बंदचा परिणाम पहावयास मिळाला. भाजीपाला, दूध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला. शहरातील उड्डाणपुलावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रमुख डॉ.धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल एक तास रस्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी उड्डाणपुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिवाजी चौक परिसरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर प्रताप देशमुख, रिपाइंचे राज्य सचिव विजय वाकोडे, माजी शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, उपमहापौर भगवान वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, कामगार नेते राजन शिरसागर, बाळासाहेब देशमुख , अ‍ॅड.माधुरी शिरसागर, कितीर्कुमार बुरांडे, गणेश घाडगे यांनी सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत मुंडण आंदोलन केले. यावेळी आता तर एकच मागणं अशा घोषणा देण्यात आल्या.

बंदच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी सकाळ पासून व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीपार्क, कच्ची लाईन आदी भागात शुकशुकाट पहावयास मिळाला. तसेच वसमतरोडवरील सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत मंगळवारी वसमतरोडवर वाहतुकीची वर्दळ कमी प्रमाणात होती. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातील बहुतांश अ‍ॅटो चालकांनी आपले वाहने बंदच ठेवली. त्यामुळे अनेक नागरिकांना अ‍ॅटो अभावी पायी चालावे लागले. रेल्वेस्थानक व बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना अ‍ॅटोअभावी अडचणींचा सामना करण्याची वेळ आली. तसेच बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त पहावयास मिळाला.

गंगाखेड बंदला प्रतिसाद
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला गंगाखेड शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने निवेदन देत ही विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास व्यापा-यांनी प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता ईतर सर्व व्यवहार पुर्णत: बंद होते. शहरातील भगवती चौकातून सर्वपक्षीय पदाधिका-यांनी तहलीसलदारांना निवेदन दिले. यातून शेतकरी विरोधातली विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

मानवत शहरात जोरदार प्रतिसाद
कृषि कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये सूरू असलेल्या आंदोलनासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. मानवत शहरातील शिवसेना , माकप, भाकप , राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रीय कॉग्रेसने या बंदमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांना जाहिर पाठिंबा दिला. बंदच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेतील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून जोरदार प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सक्रीय सहभाग घेऊन आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेऊन अन्नदाता शेतकरी यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

शेतकरी विरोधी कायद्याची होळी
कृषि कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये सूरू असलेल्या आंदोलनासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. मानवत शहरातील शिवसेना , माकप, भाकप , राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रीय कॉग्रेसने या बंदमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांना जाहिर पाठिंबा दिला. बंदच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेतील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून जोरदार प्रतिसाद दिला.

विराटची ८५ धावांची खेळी व्यर्थ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या