25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeपरभणीपाच वर्षात जीएसटी संकलनात मोठी वाढ : शेवाळकर

पाच वर्षात जीएसटी संकलनात मोठी वाढ : शेवाळकर

एकमत ऑनलाईन

परभणी : गेल्या पाच वर्षात जीएटीच्या कर संकलनात मोठी वाढ झाली असून जीएसटी संकलनाने उच्चांक गाठलेला आहे. परभणी शहरात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवशीय कार्यशाळेतून उपस्थितांना कर विषयक अनेक महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थितांना कर विषयक अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्यकर उपायुक्त, नांदेड निलेश शेवाळकर यांनी केले.

जी़एसटीपीएम मुंबई, करसल्लागार संघटना परभणी आणि सी़पीई चॅप्टर परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी कायद्याला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर परभणी शहरात दि़०२ व ०३ जुलै रोजी आयोजित कार्यशाळेच्या प्रथम दिवशी शनिवार, दि़०२ जुलै रोजी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ यावेळी राज्यकर उपायुक्त श्री़निलेश शेवाळकर, पुण्याचे सी़ए़प्रितम माहुरे, करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे, सीपीईचे सी़ए़हिमांशु शहा, सी़ए़संतोष इंगळे यांच्याहस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यशाळेस सुरूवात करण्यात आली़.

पुढे बोलताना शेवाळकर म्हणाले की, परभणी सारख्या शहरात दोन दिवसीय कर विषयक कार्यशाळा आयोजित करणे कौतुकास्पद आहे. परभणी करसल्लागार संघटनेने यापुढे राज्यस्तरीय व अखिल भारतीय स्तरावरील कार्यशाळांचे आयोजन करून कर विषय ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवावे असे आवाहन शेवाळकर यांनी केले. प्रथम सत्रात प्रीतम माहुरे यांनी वस्तु व सेवाकराचे पाच वर्षे अभ्यास काल, आज आणि उद्या या विषयावर विचार व्यक्त केले. सी़.ए. प्रणव आष्टीकर, नागपूर यांनी आयकर कायदा व ट्रस्ट विषयावर तर सी़ए़प्रितम बत्रा, नागपूर यांनी जीएसटी नोटीसेस त्याची उत्तरे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी हिंगोली करसल्लागार संघटना व नांदेड करसल्लागार संघटनेचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत सी़ए़सुधाकर चिद्रवार, कर सल्लागार अ‍ॅड. बंकटलाल मुंदडा, कृषी युवा पुरस्कार प्राप्त मंगेश प्रतापराव देशमुख पेडगाव, डॉ. बालकृष्ण सोनी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक सी़ए़हिमांशु शहा यांनी तर स्वागतीय मनोगत राजकुमार भांबरे यांनी केले. सुत्रसंचलन सी़ए़अनुप शुक्ला यांनी तर आभार सी.ए. क़ुशल गंगवाल यांनी मानले़ परभणी शहरातील उत्सव हॉल, एमआयडीसी, वसमतरोड या ठिकाणी आयोजित कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सी़पी़ई़चॅप्टरचे, करसल्लागार संघटनेचे सदस्य व प्रतिनिधी आदिंनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या