26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीकोरोना काळात कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त

कोरोना काळात कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : लॉकडाऊनच्या चार महिन्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह संभाव्य गुन्हे रोखण्याकरिता जिल्हा पोलिस यंत्रणेने जुगार, दारू, गुटखा, गांजा, हत्यार, जीवनाश्यक वस्तू व वाळू तस्करी विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करीत शेकडो व्यक्तींविरूध्द शेकडो गुन्हे नोंदवून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिका-यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व विशेष पथकाच्या माध्यमातून गेल्या ४ महिन्यांत मटका, तिर्रट, पत्ते, जुगाराचे एकूण ९६ केसेस दाखल झाल्या. त्यातून ५४५ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातून ४५ लाख २७ हजार ४७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच काळात अवैधदारू विरोधातही दारू बंदी कायद्यातंर्गत विविध पोलिस ठाण्यात ४५२ गुन्हे दाखल करून ५६८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८९ लाख ४८ हजार ६६७ रुपये किंमताचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विक्रीला बंदी असून जिल्हा पोलिस यंत्रणेद्वारे गुटख्याच्या चोरट्या
विक्रीला आळा घालण्याकरिता विविध पोलिस ठाण्यांच्या माध्यमांतून छापे टाकण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली.

त्यातून ६२ गुन्हे दाखल केल्या गेले. १२४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ९५ लाख ९ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच बरोबर एनडीपीएस (गांजा) अधिनियमप्रमाणे एक गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली. विनापरवाना अवैधरित्या घातक हत्यार बाळगणा-यां सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. तसेच ईसी अ‍ॅक्ट (जीवनाश्यक वस्तू अधिनियम) प्रमाणे ३ गुन्हे दाखल करून यात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख २५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे व पथकांच्या माध्यमातून वाळू चोरीला आळा बसावा यासाठी या संदर्भात ४८ गुन्ह्यांची नोद करून वाळूची चोरटी वाहतुक व साठा करणाठया १६४ आरोपींना अटक करण्यात आली. या दाखल ६५ गुन्ह्यात एकूण ५ कोटी ५४ लाख ७३ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढेही जे कोणी अवैधधंदे, जुगार, दारूबंदी कायदा भंग, गुटखा, अंमली पदार्थ बाळगणे व विक्री करणे, वाळू चोरी, जीवनाश्यक वस्तूंचे अधिनियमांचे उल्लंघन करेल, त्यांच्या विरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे.

Read More  जेनेलियासमवेत रितेश बनविणार “शाकाहारी मीट’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या