27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीपिक विम्याच्या पैशासाठी भाजपा करणार तीव्र आंदोलन

पिक विम्याच्या पैशासाठी भाजपा करणार तीव्र आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : मागील वर्षातील रिलायन्स कंपनीकडे शेतकऱ्यांचे विम्याचे सुमारे ३०० ते ३१० कोटी रुपये थकीत आहेत. हे पिक विम्याचे पैसे कंपनीने शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी करत गावपातळीवर आंदोलन करणार तसेच यापुढे ‘रिलायन्स गो बॅकचा नारा भाजपा, भाजपा किसान मोर्चा आणि शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहीती भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी रविवार दि. १२ जुन रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपा नेते विजयराव वरपुडकर, संतोष मुरकुटे, विठ्ठलराव रबदडे, विलास बाबर, पी.डी. पाटील, प्रमोदराव वाकोडकर, बाळासाहेब भालेराव आदींची ऊपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले की, २०१७ ला केलेल्या ऊपोषणानंतर रिलायन्स कंपनीने थोडाफार मावेजा दिला. त्यानंतर ३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या. यातील २ लाख तक्रारी कंपनीने ग्रा धरल्या. तक्रार केली नसल्याने ४०% शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसेच आले नाहीत. तसेच पात्र शेतकऱ्यांनाही विम्याचे पैसे मिळाले नाहीत. पिक कापणीतही उत्पन्न कमी दाखवले गेले. ५२ महसुल मंडळापैकी ४५ मंडळात कंपनीने आक्षेप घेतला.

शेतकऱ्यांचे ३०० कोटी रुपये गिळंकृत करण्यासाठी कंपनीने दिल्लीला अपिल केले. आता ४५ मंडळातील २ लाख ७२ हजार ३२५ शेतकऱ्यांना सुमारे ३०० ते ३१० कोटी रुपये मिळावेत यासाठी भाजपा, भाजपा किसान मोर्चा आणि शेतकरी संघटनेच्या गाव पातळीवरही तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच यापुढे राज्य सरकारने रिलायन्स कंपनीला परभणी जिल्ह्यासाठी वगळावे ही मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान परभणीसाठी रिलायन्स कंपनीच यापुढे असेल तर ‘रिलायन्स गो बॅक नारा देत शेतकऱ्यांना पिक विमा न भरण्याचेही आवाहन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खताच्या कृत्रिम टंचाईबाबतही दिले निवेदन
गेल्या काही दिवसांपासुन कृत्रिम टंचाई निर्माण करत खतासाठी शेतकऱ्यांची अडवणुक करण्यात येत आहे. याबाबतही जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले असुन आता दुकानांसमोर खताच्या साठ्याची यादी लावणेही बंधनकारक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या